स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी सलग ६ दिवस बँका राहणार बंद

देशातील सर्वात मोठी सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामधील कोट्यवधि ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सलग ६ दिवस बंद राहणार आहे.
कर्मचारी संघटना २५ आणि २६ मे रोजी संपावर जाणार आहेत. त्यामुळे दोन दिवस बंद असणार आहेत. २५ मे रोजी सोमवार आहे. २६ मे रोजी मंगळवार आहे. त्याआधी २३ आणि २४ मे रोजी शनिवार रविवारी वीकेंडमुळे सुट्टी असणार आहे. यानंतर लगेचच २७ आणि २८ मे रोजी बकरी ईदमुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत. असं एकूण ६ दिवस बँका बंद असणार आहेत.
स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. संप झाल्यास सलग ६ दिवस दिवस बँका बंद असणार आहे. त्यामुळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर त्याआधी बँक सुरु आहे की नाही हे चेक करा.
स्टेट बँकेचे कर्मचारी २५ आणि २६ मे रोजी संपावर जाणार आहे. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने या संपाची हाक दिली आहे. फेडरेशनच्या म्हणण्यांनुसार, कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष होत आहे. अनेक करारांची अंबलबजावणी झालेली नाही. त्यामुळेच हा संप करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?
फेडरेशनने बँक व्यवस्थापनासमोर १६ मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये भरती, निवृत्तीवेतन, पदोन्नती आणि कामाच्या सुविधांचा समावेश आहे. युनियनचे म्हणणे आहे की सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून थांबली आहे. त्यामुळे भरतीबाबतच्या प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे.




