ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचा महाराष्ट्र दिनी शुभारंभ

अहिल्यानगर

एका वर्षात १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प.

अहिल्यानगर मधे निसर्गाचा दिवसेंदिवस ढासळत चाललेला समतोल व त्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व सर्वांनाच माहित आहे. परंतु प्रत्यक्ष कृती होत नाही.

ही बाब लक्षात घेऊन अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर ॲड धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचा शुभारंभ ०१ मे – महाराष्ट्र दिनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील व नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर ज्योतीताई गाडे आयुक्त यशवंत डांगे, सर्व पदाधिकारी व नगरसेवक नगरसेविका यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

अहिल्यानगर महानगरपालिका व साईद्वारका सेवा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने ही वृक्षारोपण व संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार दिनांक ०१ मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता नगर मनमाड रोडवरील माऊली सभागृह येथे होणार असून सर्व वृक्षप्रेमींनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मोहिमेचे आयोजक उपमहापौर जाधव यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे