अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरात घरगुती गॅस टाक्यातील गॅस वाहनामध्ये चोरट्या पध्दतीने रिफिल करणारे सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई

मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गॅस टाक्याची अवैध साठवणुक करुन अवैध्यरित्या वाहनामध्ये गॅस रिफीलिंग करणारे ठिकाणांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सुनिल पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर शहरामध्ये माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथका दिनांक 28/04/2026 रोजी अहिल्यानगर शहरामध्ये पेट्रोलींग करत असतांना पथकास सोहम वॉशिंग सेंटरच्या बाजुला, पाईपलाईन रोड या ठिकाणी एक इसम पत्र्याचे शेडमध्ये घरगुती गॅस टाक्यामधुन वाहनामध्ये गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता, सदर ठिकाणी इसम नामे सचिन अशोक भांड वय 36 वर्षे, रा. शिमला कॉलनी, भिस्तबाग रोड, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर हा मिळुन आला. सदर इसमाचे कब्जामध्ये 10,000/- रुपये किमतीची एक सिल्व्हर रंगाची इलेक्ट्रीक मोटार, त्यास गॅस रिफिलिंग साठी लागणारे पाईप, नोझल जोडलेले, 6000/- रुपये किमतीची एक एच.पी. कंपनीची घरगुती गॅस वापराची अर्धवट भरलेली टाकी, 500/- रुपये किमतीचा वजनकाटा असा एकुण 16,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
ताब्यात घेतलेल्या इसमाने शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, एच. पी. गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यामधुन वाहनामध्ये गॅस रिफिंलिंग करतांना ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल अशा धोकादायक पध्दतीने ठेवुन, विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पोहेकॉ/2084 गणेश शिवाजी धोत्रे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पो. स्टे. गु. र. नं. 289/2026 भारतीय न्याय संहिता कलम 225, 287, 288 सह जीवनावश्यक वस्तु कायदा कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.




