ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

केडगाव परिसरातील वैष्णवनगर येथे मालमत्तेच्या वादातून मुलानेच आपल्या वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला

अहिल्यानगर

केडगाव परिसरातील वैष्णवनगर येथे मालमत्तेच्या वादातून मुलानेच आपल्या वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना रविवारी (26 एप्रिल) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जखमी वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सदाशिव शंकर भिंगारदिवे (वय 61, रा. तिरंगा चौक, वैष्णवनगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते निवृत्त सुभेदार असून कुटुंबासह राहतात.

त्यांचा मुलगा शिवम भिंगारदिवे (वय 25) याला गांजा व मद्याचे व्यसन असून तो वारंवार पैशांसाठी घरात वाद घालत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावेळी सर्वजण घरी असताना शिवम याने वडिलांना त्यांच्या नावावरील सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी केली. मात्र, सदाशिव भिंगारदिवे यांनी मुलगा कोणतेही काम करत नसल्याने तसे करण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या शिवमने हातातील लोखंडी रॉडने वडिलांना मारहाण केली.

या हल्ल्यात सदाशिव यांच्या कपाळाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच मुलाने मालमत्ता माझ्या नावावर केली नाही तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. आरडाओरडा ऐकून घरातील इतर सदस्यांनी हस्तक्षेप करून भांडण थांबवले.

घटनेनंतर जखमी भिंगारदिवे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे