ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

भागीदारीचा हिस्सा मागितल्याने व्यावसायिकास बेदम मारहाण, नगर एमआयडीसी परिसरातील घटना

अहिल्यानगर

नगर एमआयडीसी परिसरातील कंपनीत असलेला भागीदारीचा हिस्सा मागण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकाला आणि त्यांच्या मुलांना लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.याबाबत निघोज (ता. राहता )येथील रहिवासी रामदास किसन गडकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. नगर एमआयडीसी येथील श्रेया इंडस्ट्रीज कंपनीमध्ये त्यांचा भागीदारीचा हिस्सा आहे.

२२ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गडकर हे त्यांचे पुत्र शुभम आणि निलेश यांच्यासह कंपनीत हिस्सा मागण्यासाठी गेले होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे