ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

भरतनाट्यम नृत्य कलाकार कुमारी नताशा चंद्रकांत पंडित हिची दूरदर्शन च्या ‘बी-हाय ग्रेड’ साठी निवड

अहिल्यानगर

अहिल्यानगरची कन्या राष्ट्रीय पातळीवर झळकली. भरतनाट्यम नृत्य कलाकार कुमारी नताशा चंद्रकांत पंडित हिची दूरदर्शन च्या ‘बी-हाय ग्रेड’ साठी निवड..

अहिल्यानगरच्या श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ.वर्षा पंडित आणि श्री चंद्रकांत पंडित यांची कन्या कुमारी नताशा चंद्रकांत पंडित हिची मुंबई दूरदर्शनची बी-हाय ग्रेड कलाकार म्हणून नुकतीच निवड झाली आहे . मुंबई दूरदर्शने जाहीर केलेल्या मान्यताप्राप्त कलाकारांमधे कु नताशा हिची भरतनाट्यम नृत्य कलावंत म्हणून निवड करण्यात आली. चेन्नई दूरदर्शनची ती मान्यताप्राप्त कलाकार असून चेन्नई दूरदर्शनवर तिने नृत्यकलेचे सादरीकरण देखील केले आहे. कु नताशा हिने आपली आई नृत्यतपस्वी सौ.वर्षा पंडित यांचे कडून प्रेरणा घेऊन आपली कला जोपासली व पुढे वृद्धिंगत केली.

भरतनाट्यमच्या गांधर्वच्या परिक्षांमधे उत्तम गुण प्राप्त करत ती विशारद उत्तीर्ण झाल्यानंतर चेन्नई येथील कलाक्षेत्र फाऊंडेशन या नामांकित संस्थेमधून मधून नृत्याचे पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर चेन्नईतील सहृदय फाऊंडेशनचे श्री शिजीत कृष्ण यांचेकडे भरतनाट्यमचे अँडव्हान्स शिक्षण घेतले तसेच भरतनाट्यम मध्येच एम ए पदवीही प्राप्त केली.

सध्या ती नृत्य साधकांना नृत्यकलेचे शिक्षण देत आहे.
नताशा एक उत्तम शास्त्रीय नृत्यांगना तर आहेच पण त्याबरोबरच इतरही अनेक उत्तमोत्तम कला व कौशल्ये तिच्याकडे आहेत. इतक्या व्यस्ततेतूनही चित्र काढणे , कविता करणे , फोटोग्राफी या सारखे छंदही ती जोपासत असते.

दूरदर्शनच्या या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे