ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बॅक टु स्कुल औक्षण करत वंडर किड्स प्री स्कूलमध्ये नवागत चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत

अहिल्यानगर

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि रंगतदार वातावरणात करत सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील रेणुका माता मंदिरामागे असलेल्या वंडर किड्स प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुपमध्ये तसेच नर्सरी, एल के जी यू के जी मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत चिमुकल्यांचे पारंपरिक औक्षण करून खास स्वागत करण्यात आले. या अनोख्या स्वागत सोहळ्यामुळे शाळेचा परिसर दिवसभर आनंदाने बहरून गेला होता.

शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळ्या, रंगीबेरंगी फुगे आणि लहान मुलांना आकर्षित करणारी देखणी सजावट करण्यात आली होती. मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी रिमोट कार, उंट सवारी, बलून फायरिंग, सी-सॉ, घसरगुंडी यांसारख्या विविध खेळांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे शाळेचा परिसर एखाद्या फन-फेस्टिव्हलप्रमाणे दिसत होता.

पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत गंध, अक्षदा आणि औक्षण करून करण्यात आले. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी आणि शिक्षकांनी हवेत रंगीबेरंगी फुगे सोडत आनंद व्यक्त केला. अनेक पालकांनी मुलांसोबत सेल्फी घेत या खास क्षणांची आठवण आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

वंडर किड्स प्री स्कूलमध्ये दरवर्षी नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत अशाच अनोख्या आणि प्रेमळ पद्धतीने केले जाते. शाळेच्या मुख्य संचालिका वैशाली जाधव यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. वडगाव गुप्ता येथेही वंडर किड्सची शाखा कार्यरत असून भविष्यात ही संस्था इयत्ता दहावीपर्यंतचे संपूर्ण स्कूल सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वागत समारंभानंतर चिमुकल्यांनी विविध खेळांचा मनमुराद आनंद घेतला. “हसत-खेळत शिक्षण”, “निसर्गातून ज्ञान” आणि “खेळातून विकास” या संकल्पनेवर आधारित अभ्यासक्रमामुळे वंडर किड्स प्री स्कूल पालकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे.

शिक्षणाचा मजबूत पाया घालण्यासाठी आधुनिक पद्धतीने शिक्षण दिले जात असल्याने नवोदित पालकांकडून या शाळेला मोठी पसंती मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे