
दि.- 5.6.2026 रोज शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिना निमित्त फरांदे पार्क येथे वूक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम ब्रह्माकुमारिज प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालय फरांदे पार्क,वूक्षमित्र फाॅनडेशन नांदेड व हनुमान मंदिर कमिटी फरांदे पार्क यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला आ.बालाजीराव कल्याणकर, ब्रह्माकुमारिज अनिता दिदि, विठ्ठलराव पावडे,BDO प्रविण सुरडकर सर पंचायत समिती नांदेड,कूषी विस्तार अधिकारी कांबळे,हरित अभियान वूक्षमित्र फाॅनडेशन चे संतोषराव मुगटकर,वडजे काका इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात वेगवेगळ्या झाडांची लागवड करण्यात आली संगोपन करण्याची व दरवर्षी जास्तीत जास्त झाडांची लागवड करण्याची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला बि.के.योगिनी बहन बि.के सुनील देशमुख भाई,बि.के.निळकंठ जाधव भाई उद्योजक राजेंद्र शंकरपुरे,वसंत कराळे,डाॅ.रुपाली माने,डाॅ.येवलीकर मॅडम,मायराळ मॅडम, हनुमान मंदिर कमिटी चे सर्व पदाधिकारी व ब्रह्माकुमारिज बि. के.परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते




