ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

श्रीरामपुरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार

अहिल्यानगर मधील श्रीरामपुरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सुदैवाने हल्लेखोराचा नेम चुकल्याने प्रशांत कहाणे थोडक्यात बचावले. या घटनेनंतर श्रीरामपुरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास केला जात आहे श्रीरामपुरात येथील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सुदैवाने या हल्ल्यात नेम चुकल्यामुळे प्रशांत कहाणे थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली.

प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने थेट गोळीबार केला. चालत्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला, मात्र हल्लेखोरांचा नेम चुकल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कहाणे सुरक्षितपणे बचावले.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या भागाची पाहणी केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

भररस्त्यात राजकीय पदाधिकाऱ्यावर झालेल्या या गोळीबारामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे