ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पनीर खाणाऱ्यांनो सावधान, सरकारने घेतला मोठा निर्णय, हॉटेलवाल्यांवर होणार कारवाई, परिपत्रक जारी

महाराष्ट्रानंतर आता केंद्र सरकारने ‘आर्टिफिशियल पनीर’ म्हणजेच चीज अनॅलॉगवर मोठा निर्णय घेतला आहे. फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडियाच्या (FSSAI) नियमांनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त पर्याय विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. १ मेपासून या नियमांची अंमलबजावणी होणार असून ग्राहकांची फसवणूक रोखण्यावर भर दिला जाणार आहे.

पनीर म्हणून चीज अनॅलॉग अर्थात आर्टिफिशियल पनीर विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या आदेशानंतर केंद्र शासनाकडून देखील अंमलबजावणीचे आदेश दिले. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी ही माहिती दिली. देशातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स, फास्ट फूड चालकांना केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले. एफएसएसएआयकडून कारवाईसाठी परिपत्रक जारी करण्यात आले.

विधीमंडळ अधिवेशनात विक्रमसिंह पाचपुते यांनी आर्टिफिशियल पनीरचा मुद्दा मांडला होता. १ मे पासून पनीर ऐवजी चीज अनॅलॉग म्हणून मेनू कार्डमध्ये बदल करावा लागणार आहे. मेनू कार्डमध्ये बदल न केल्यास एफडीए आणि एफएसएसएआयकडून कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना देखील पनीर खाताना ते आर्टिफिशियल पनीरसारखे लागले तर त्यांनी तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले जात आहे.

पनीर आणि चीज अनॅलॉगमध्ये फरक काय?

1) पनीर फक्त दूध फाडून बनवले जाते. चीज अनॅलॉगमध्ये पाम तेल, स्टार्च आणि दुधाचे घन पदार्थ वापरले जातात.
2) पनीरमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन आणि कॅल्शियम असते.
3) चीज अनॅलॉगमध्ये प्रथिने कमी आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असतात.
4) खरे पनीर मऊ आणि सहज तुटणारे असते.
5)  चीज अनॅलॉग रबरासारखे, चिवट आणि थोडे तेलकट असते.
6) चीज अनॅलॉग हे खऱ्या पनीरच्या तुलनेत खूप स्वस्त असते.
7) चीज अनॅलॉग १५० ते २१० रुपये किलो दराने मिळते. तर पनीरचा दर ३५० ते ४०० रुपये किलो आहे.
8) वनस्पती तेल आणि दूध किंवा दुधाची भुकटी एकत्र करून तयार होणाऱ्या चीज अ‍ॅनालॉगचा पनीर म्हणून आहारात समावेश केला जातो.
9) चीज अनॅलॉग खाल्ल्याने मेद वाढणे, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासह पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात.
10) पनीरऐवजी पर्यायी पदार्थ म्हणून चीज अनॅलॉग वापरणे ही एका अर्थाने ग्राहकांची फसणवूक आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे