ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पुण्यातील रांका ज्वेलर्समध्ये १८ कोटींचा अपहार

पुणे

पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्समध्ये सुमारे १८ कोटी रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचा मॅनेजर प्रशांत बर्मेचा आणि अहिल्यानगरमधील पराळे कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४० वर्षे सेवेत असलेल्या मॅनेजरने मालकांना अंधारात ठेवून, सेल्सगर्लकडून ‘जांगड’ (अँप्रुव्हल) तत्त्वावर दागिने ताब्यात घेतले. आणि ते परस्पर कविता पराळे, रमाकांत पराळे व त्यांच्या मुलीला दिले.

या टोळीने संगणमत करून सुमारे १२,८०० ग्रॅम सोन्याची अफरातफर केली. पुणे पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तपासातील प्रगती लक्षात घेता, पुणे न्यायालयाने मॅनेजरसह तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत १ मेपर्यंत वाढ केली आहे, तर मुख्य संशयित कविता पराळे यांची कोठडी ३० एप्रिलला संपणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे