ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

२०२६ च्या जनगणनेची तयारी वेगात, दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्णत्वाकडे

अहिल्यानगर

शिक्षक व महापालिका कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण.नागरिकांनी जनगणना प्रक्रियेला सहकार्य करण्याचे करावे – आयुक्त यशवंत डांगे. 

अहिल्यानगर  देशात २०२६ मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून जनगणनेच्या तयारीला वेग आला आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. जनगणना प्रक्रियेचे महत्त्व, माहिती संकलनाची अचूक पद्धत, नागरिकांशी संवाद कसा साधावा यासह विविध बाबींवर कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. लवकरच जनगणनेचे काम प्रत्यक्ष सुरू होणार असून नागरिकांनीही जनगणनेत सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये आयोजित या प्रशिक्षणात शिक्षक तसेच महापालिका कर्मचारी सहभागी झाले आहे.

महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत जनगणना अधिकारी शाम गोडळकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षक मीरा जाधव व गीतांजली जोंधळे यांनी मार्गदर्शन केले. जनगणना करताना आवश्‍यक असलेली दक्षता, माहितीची गोपनीयता आणि अचूकता यावर भर देण्यात येत आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण २५ ते २७ एप्रिल दरम्यान पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण २८ ते ३० एप्रिल दरम्यान होत आहे. तिसरा टप्पा २ ते ४ मे दरम्यान होणार असून, अंतिम प्रशिक्षण ५ ते ७ मे या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये उर्वरित प्रगणक, पर्यवेक्षक तसेच राखीव व गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जनगणना ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने नागरिकांनी प्रगणकांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जनगणना अधिकारी शाम गोडळकर यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे