ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

खाजगी रुग्णालयांत हजारो रुपये खर्च कशाला? महानगरपालिकेच्या दवाखान्यांत केवळ १० रुपयांत उपचार, मोफत तपासण्या उपलब्ध

अहिल्यानगर

महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आयुक्त यशवंत डांगे यांचे आवाहन.

अहिल्यानगर महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्यासाठी दर महिन्याला लाखो रुपये खर्च करत आहे. मनपाच्या सर्व आरोग्य केंद्रांवर, दवाखान्यांत केवळ १० रुपयांत संपूर्ण उपचार सुविधा व मोफत तपासण्या उपलब्ध आहेत. असे असतानाही अनेक नागरिक उपचारांसाठी खाजगी रुग्णालयांमध्ये हजारो रुपये खर्च करत आहेत.

महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये अनुभवी डॉक्टर, चांगल्या प्रतीची औषधे, अत्याधुनिक सेवा व मोफत तपासण्या उपलब्ध असल्याने नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासन व महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. सध्या शहरात ७ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १८ आयुष्मान आरोग्य मंदिर नागरी आरोग्य केंद्रे आणि २ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशी एकूण २७ आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून १४२ कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असून, दरमहा सुमारे ३९ लाख ३० हजार रुपये खर्च केला जातो.

शहरातील प्रमुख नागरी आरोग्य केंद्रे पुढीलप्रमाणे —

जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र, महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, मुंकुंदनगर नागरी आरोग्य केंद्र, नागापुर नागरी आरोग्य केंद्र, यशोदा नगर सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र, शिवाजी नगर नागरी आरोग्य केंद्र (कल्याण रोड), सिद्धार्थ नगर नागरी आरोग्य केंद्र, रामवाडी नागरी आरोग्य केंद्र, टीव्ही सेंटर नागरी आरोग्य केंद्र, हिम्मत नगर नागरी आरोग्य केंद्र, ढवण वस्ती नागरी आरोग्य केंद्र, दगडी चाळ नागरी आरोग्य केंद्र, तपोवन रोड नागरी आरोग्य केंद्र, वैदुवाडी नागरी आरोग्य केंद्र, बोल्हेगांव गावठाण नागरी आरोग्य केंद्र, इंदिरा नगर नागरी आरोग्य केंद्र, भूषण नगर नागरी आरोग्य केंद्र, संजय नगर नागरी आरोग्य केंद्र, सारसनगर नागरी आरोग्य केंद्र (मधुबन कॉलनी), त्रिमूर्ती चौक नागरी आरोग्य केंद्र (सारसनगर), रेल्वे स्टेशन नागरी आरोग्य केंद्र, शास्त्री नगर नागरी आरोग्य केंद्र, ठुबे मळा नागरी आरोग्य केंद्र तसेच हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नालेगाव व श्रमिक नगर येथेही सुविधा उपलब्ध आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे