ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

सोलापुर मधील पल्लवी वाले यांनी बनवलं कटाच्या आमटी चे प्रिमिक्स ..

सोलापूर

आजकाल महिला नवीन व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. असाच व्यवसाय सोलापूर शहरातील विजापूर रोड येथील राहणाऱ्या पल्लवी वाले यांनी केला आहे. त्यांनी झटपट पुरणपोळी प्रिमिक्स हा व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे पुरणपोळी बनवायला जास्त वेळ लागत नाही. अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये ही पुरणपोळी तयार होते.

सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर पुरणपोळी बनवण्यास तासन् तास लागतात. त्यामुळे पल्लवी यांनी वेळेची बचत, आरोग्य आणि घरगुती चव यांचा विचार करून हा प्रिमिक्स तयार केला.

यासाठी पल्लवी शेतकऱ्यांकडून विनापॉलिश हरभऱ्याची डाळ घेऊन केमिकल-मुक्त शिजवतात. त्यानंतर त्यामध्ये तेलाचा वापर न करता सेंद्रिय गूळ, हळद आणि वेलची पावडर टाकली जाते. फक्त पाणी मिसळून गोळा करा, कणिक लाटा आणि तव्यावर 5-10 मिनिटांत पुरणपोळी तयार होते.

यासोबतच त्यांच्याकडे कटाची आमटीचा प्रिमिक्सही उपलब्ध आहे. त्यात कट, गूळ, चिंच, मसाले, कढीपत्ता पावडर, तिखट-मीठ असून, तेलाची फोडणी देऊन त्यामध्ये पाणी टाकून 10 मिनिटांपर्यंत उकळून घ्यायचं आणि कटाच्या आमटीचा प्रिमिक्स तयार होतो.

या पुरणपोळीच्या प्रिमिक्सच्या पाकिटाची किंमत 150 ते 800 रुपयांपर्यंत आहे. यामधून त्यांची महिन्याला 1 लाखांची कमाई होते.

घरामध्ये सुरू केलेल्या या व्यवसायाने पल्लवी यांनी महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून धावपळीतही महाराष्ट्रीय स्वाद जपण्याचा हा प्रयत्न लोकप्रिय होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे