ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

मुंबई प्रांतिय पद्मशाली महिला विभागाचे वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

मुंबई

मुंबई येथील सिध्दी विनायक मंदिर प्रभादेवी जवळ रविंद्र नाट्य मंदिर येथे मुंबई प्रांतिय पद्मशाली संघमच्या महिला विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यांत आले.

या कार्यक्रमांस प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संघम अध्यक्षा संगीताताई इंदापुरे, प्राध्यापक डाॅ.विमला मुशम आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दिव्यांग शिक्षिका भाग्यश्री नडीमेटला यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला दिन संपन्न झाले.

प्रथम प्रमुख पाहूण्यांचे हस्ते श्री मार्कंडेय प्रतिमेचे पुजन करून व्दिप प्रज्वलन करण्यांत आले. त्यानंतर विविध विभाग संघमचे वतीने जुने सिनेमा विविध नटींच्या तेलुगू गाण्यांवर नृत्य सादर करून जुन्या नटींना आदरांजली वाहिली आणि आठवणींना उजाळा देऊन उपस्थितांचे मने जिंकले.यावेळी प्रमुख पाहूण्यांचे शाल, बुके, मुमेंटम आणि श्री मार्कंडेय मुर्ती देऊन सत्कार करण्यांत आले.

या कार्यक्रमांस मुंबई प्रातांतील 29 विविध पद्मशाली संघम उपस्थित होते. त्यातील 17 संघम ने सहभाग घेतला. प्रत्येक भाग घेतलेल्या संघास संघमच्या वतीने सन्मानपत्र बुके आणि मुमेंटम देऊन सन्मान केले.

मार्गदर्शन पर भाषणांत संगीताताई इंदापुरे यांनी आताच्या पिढीला आई वडीलांनी मुलांना घरातूनच महिलांना सन्मान देण्यांचे संस्कार करावे.

कार्यक्रमांत सिनेमातील जुन्या नटींच्या गाणेवर नृत्य सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिले बद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमांस महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे प्रधानसचिव यशवंत इंदापुरे, मुंबई प्रांतिय पद्मशाली संघमचे अध्यक्ष सैव्ही रामुलू, सचिव यापूरम व्यंकटेश, महिला अध्यक्षा सुरेखा कटकम, श्रम मंत्रालय नवी दिल्लीचे डायरेक्टर जयप्रकाश वेमुला, उमा चिट्याला, सिध्दी विनायक मंदिराचे विश्वस्त एकनाथ संगम, महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे श्रीनिवास भिमनाथ, कामाठीपुरा पद्मशाली संघमचे अध्यक्ष मुरली लवशेट्टी,तसेच विविध संघमचे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी महिला संघमचे सचिवा कविता पेरला आणि कार्यकारी मंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चित्रा वनम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सचिव व्यंकटेश यापुरम यांनी केले. अध्यक्ष रामुलू सैव्ही यांनी आभार मांडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे