ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर स्वस्तिक बसस्थानकामध्ये महिला वाहकाला मारहाण

अहिल्यानगर

अहिल्यानगर स्वस्तिक बसस्थानकामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकास मारहाण झाल्याची घटना घडली.

बस उभी करताना इशारा देणार्‍या वाहकास शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशा घुले (वय 40, रा. पिंपळगाव रोठा, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. किसन धनवटे (मुळ रा. देहरे, ता. अहिल्यानगर हल्ली रा. सावेडीगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

रविवारी (1 मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास बसस्थानकामध्ये ही घटना घडली. चालक बस उभी करत असताना, महिला वाहक घुले या खाली उतरून त्यांना इशारा देत होत्या.

यावेळी तिथे आलेल्या धनवटे याने बस बाबत विचारणा केली. घुले यांनी काही क्षण थांबण्यास सांगितले असता, त्याला राग अनावर झाला.धनवटे याने महिला वाहक घुले यांना शिवीगाळ केली. एवढेच नाही तर, त्याने शर्ट पकडून मारहाण केली.

या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. उपस्थित सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून मारहाण करणार्‍या धनवटे याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी किसन धनवटे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे