ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘इनुची गोष्ट’ला राज्य शासनाचा ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ जाहीर

२७ फेब्रुवारीला नाशिक येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार गौरव

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि जीवघेण्या कॅन्सरवर जिद्दीने मात करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील अतिशय दुर्गम गाव कोथूळ येथील तरुण लेखक युनुस सय्यद यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘इनुची गोष्ट’ या आत्मचरित्राला मराठी भाषा विभागातर्फे दिला जाणारा ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२४’ (लक्ष्मीबाई टिळक) यांच्या नावाने असलेला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे आयोजित विशेष सोहळ्यात राज्याचे मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत आणि नाशिकचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

मृत्यूच्या दारातून साहित्याच्या शिखरापर्यंतचा प्रवास

युनुस सय्यद यांचा प्रवास थक्क करणारा आहे. कोथूळसारख्या दुर्गम गावातून येत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना ‘ब्लड कॅन्सर’चे निदान झाले. घरची अठराविश्व दारिद्र्य असतानाही, खचून न जाता त्यांनी तीन वर्षे कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली. या वेदनादायी प्रवासातील प्रत्येक क्षण त्यांनी ‘इनुची गोष्ट… अजून मी जिवंत आहे’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

पुस्तकाचे वेगळेपण:

* प्रेरणादायी गाथा: लेखकाचे टोपणनाव ‘इनु’ असल्यामुळे त्यांनी पुस्तकाला हे नाव दिले. हे पुस्तक केवळ आत्मकथन नसून कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी जगण्याची नवी उमेद आहे.

* कमी वयात बहुमान: इतक्या कमी वयात राज्य शासनाचा सर्वोच्च वाङ्मय पुरस्कार मिळवणारे युनुस सय्यद हे नगर जिल्ह्यातील पहिलेच तरुण लेखक ठरले आहेत.

* सामाजिक उद्देश: सामान्य रुग्णांना कॅन्सर ट्रीटमेंटची माहिती मिळावी आणि संकटात सापडलेल्या लोकांना प्रेरणा मिळावी, हा या लेखनामागील मुख्य उद्देश आहे.

युनुस सय्यद यांच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात त्यांची आणखी तीन पुस्तके प्रकाशित होत असून साहित्यातील त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी दीपस्तंभ ठरत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

लेखक: युनुस सय्यद

मोबाईल क्रमांक: ७३०४९२८८९७

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे