ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शब्दशिल्प कलाविष्कार संघ साहित्य परिवारास शुभंकरोती साहित्य संस्थेतर्फे मराठी प्रकाशवाट पुरस्कार प्रदान

शुभंकरोती साहित्य परिवारची साहित्यिक चार वर्षाची यशस्वी वाटचाल मार्गस्थ होऊन चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाशिक नगरीत पुस्तकांचे हॉटेल याठिकाणी उत्साही वातावरणात ८ फेब्रुवारी २०२६ रोजी काव्य संमेलन आयोजन केले होते.

त्यात मराठी साहित्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या अनेक दिग्गजांना तसेच संस्थांना सन्मानित करण्यात आले. शब्दशिल्प कलाविष्कार संघ, जो कोरोना काळात नोंदणीकृत संस्था ऑनलाईन प्रारंभ होऊन अनेक नवोदित हात लिहिते केले, विविध लेखन प्रकार परिचित करून त्याचे सराव करून घेतले, यशस्वी पन्नासहुन अधिक ऑनलाईन कार्यशाळा आयोजन केले.

उत्कृष्ट उपक्रम आयोजन, काव्यलेखन-कथा लेखन स्पर्धा आयोजन, द्वितीय वर्धापन दिनी ऑफलाईन काव्यसहल आयोजन व नवरंग प्रातिनिधिक काव्यसंग्रह भव्य प्रकाशन तसेच शब्दशिल्प प्रकाशन प्रारंभ केला.

साल २०२४ मध्ये प्राथमिक राज्यस्तरीय जिजामाता काव्यसंमेलन यशस्वी आयोजन ज्यात संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरूनही एकूण 78 कवितांचे वाचन झाले होते.

संपूर्ण वर्षात अनेक ऑनलाईन लेखन, वाचन, गायन, दृकश्राव्य सादरीकरण असे नानाविध उपक्रम साजरे होतात. पाच वर्षाच्या या अविरत निस्वार्थ साहित्य सेवेची दखल घेऊन शुभंकरोती साहित्य संस्थेतर्फे मराठी प्रकाशवाट हा उच्चस्तरीय पुरस्कार शुभंकरोती संस्थापक माननीय सोनाली जगताप यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

त्यावेळी तेथे ज्येष्ठ साहित्यिक सुमती पवार, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सुरेश पवार गझलकार मनोज वराडे, गझलकार रवींद्र यशवंतराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

शब्दशिल्प परिवाराच्या वतीने हा पुरस्कार शब्दशिल्प संस्थापक-कार्याध्यक्षा गीतांजली वाणी यांच्यावतीने आयोजक अर्चना नावरकर यांच्या समवेत शब्दशिल्प परिवारातील ज्येष्ठ साहित्यिका रंजना बोरा, कालिंदी वाणी, रेखा वाणी, विद्या कुलकर्णी, शुभांगी शिरुडे, रेखा मालपुरे या सर्वांच्या उपस्थितीत स्विकारला. शब्दशिल्प परिवारातर्फे सोनाली ताई जगताप यांचा सत्कार केला.

शब्दशिल्प कला विष्कार संघाच्या यशस्वी वाटचालीत संस्थापक कार्याध्यक्षा गीतांजली वाणी आयोजक समिती सदस्य राहुल मुंढे, सपना भामरे, मयूर पालकर, चंदन तरवडे, अर्चना नावरकर, प्रियांका कोठावदे, मिनल बधान या समस्त कार्यकारिणीचे अनमोल योगदान आहे.

शुभंकरोती साहित्य संस्थेच्या काव्यसंमेलनात ग्रंथ दिंडी, मान्यवरांचे मार्गदर्शन – सन्मान, गझल मुशायरा, मुलाखत, काव्य सादरीकरण असा एकदियसीय भरगच्च कार्यक्रम पार पडला.

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संस्थापिका सोनाली जगताप त्यांचे यजमान सुहास जगताप, शुभंकरोती प्रशासकीय समिती, निवेदक शिल्पा चऱ्हाटे या सर्वांनी मेहनत घेतली आणि नाशिक नगरीत आजीच्या पुस्तकांचे हॉटेल येथे उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

शब्दांकन.

हिरकणी गीतांजली वाणी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे