मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा महाराष्ट्र व भारत देशाला अभिमानास्पद – लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड
अहिल्यानगर

अ. नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजा चे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्या नगर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन भाषा विभागाच्या विभागाच्या वतीन विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते दत्तात्रय वारकड यांचे ” मायबोली मराठी अभिजात मराठी “या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
याप्रसंगी वक्ते दत्तात्रय वारकड म्हणाले अभिजात दर्जा म्हणजे उत्कृष्ट ,श्रेष्ठ , प्राचीन अशी उपाधी अभिजात दर्जा अंतर्गत मराठी भाषेला भारत केंद्र सरकारने भाषेला बहाल केला हे अत्यंत महाराष्ट्रासह भारत देशाचे भूषणावह बाब आहे. मराठी भाषेचा प्राचीन काळातील इतिहास जर आपण बघितला तर 2200 ते 2500 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा लाभलेली ही मराठी भाषा आहे.

नाणेघाटातील शिलालेखांमध्ये आढळणारे महारथीनो हा शब्द याचा पुरावा देतो. त्याचप्रमाणे आठव्या ते दहाव्या शतकातही मराठी भाषा अतिशय स्पष्टपणे अभ्यासाला दिसू लागली आणि यादव काळामध्ये तिचा विकास होऊ लागला यादव काळ म्हणजे बाराव्या व तेराव्या शतकामध्ये या भाषेचा विकास होऊ लागला तत्पूर्वी 11 व्या शतकामध्ये महाकवी गुणाढय यांचे बृहकथा हे आत्मचरित्र याचाही उल्लेख आढळून येतो व त्याचे मराठीमध्ये भाषांतर ह अ भावे यांनी कथा सरीत्सासागर या नावाने पाच खंडात केले याचा पुरावा आढळतो.
मराठी भाषेला 2000 ते 2500 वर्षापूर्वीपासूनचा व्यापक स्वरूपामध्ये पार्श्वभूमी आढळून येते यावरून मराठी भाषा ही प्राचीन भाषा, श्रेष्ठ भाषा ,स्वयंभूपणा तिच्यामध्ये असल्याचा सिद्ध होते. मायबोली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे जागतिक पातळीवर मराठी भाषेतील साहित्य याचा अभ्यासाला मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळणार आहे.
भारतातील 450 विद्यापीठ मध्ये मराठी भाषा शिकवण्याची संधी उपलब्ध होत आहे व राज्यातील 12000 पेक्षा अधिक ग्रंथालये सशक्त होणार आहेत त्याच बरोबर रोजगाराच्या नवनवीन संधी युवकांना उपलब्ध होत आहेत ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे.
तेरावे शतकामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी हा मराठी ग्रंथ लिहून त्यामध्ये ज्ञानयोग भक्तीयोग व कर्मयोग याचे महत्त्व विशद केले आहे त्याचप्रमाणे अमृता अनुभव हा मराठी भाषेची महती सांगणारा ग्रंथ मराठीमध्ये निर्माण केला मराठी वाङ्मयामध्ये निर्माण केलेल्या या ग्रंथ निर्मितीमुळे संत साहित्य व वाड्मयाकडे अवघ्या विश्वाचे लक्ष वेधले गेले शके बाराशे बारा मध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी हे महान कार्य करून ठेवले व जागतिक पातळीवर या मराठी वाड्मयाचे नोंद घेण्यात आली.
त्याचप्रमाणे संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव यासारख्या श्रेष्ठ व महान संत साहित्य यांनी देखील मराठीमध्ये अनेक ग्रंथाची निर्मिती करून अवघ्या विश्वाला मार्गदर्शन करण्याचे महान कार्य मराठी भाषेच्या माध्यमातून केले. अमृतानुभव या मराठी भाषेची महती सांगणाऱ्या ग्रंथामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात
माझ्या मराठीचा बोलू कौतुके l
परी अमृतातही पैजाची जिंके l
ऐसी अक्षरे रसिके मिळविणे |
अमृताहुनी ही जास्त गोडवा माझ्या या मायबोली मराठी भाषेमध्ये आहे असे महत्त्व माउलींनी स्पष्ट केले आहे.
3 ऑक्टोबर 2024 मध्ये भारत केंद्र सरकारने मायबोली मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल केला मराठी भाषेसह इतर पाच भाषा संस्कृत तेलगू तामिळ मल्याळम आणि कन्नड या भाषांना देखील केंद्र सरकारने अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे.
व्याख्यानात पुढे बोलताना वारकड म्हणाले की मराठी भाषेचा अभिजात हा दर्जा टिकून ठेवण्यासाठी व त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तरुण पिढी यांचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे तंत्रज्ञान डिजिटल साक्षरता आणि संशोधनाद्वारे हे कार्य तरुणांकडून घडणे शक्य होईल. ऐतिहासिक ग्रंथांचे डिजिटायझेशन करणे भाषेवर आधारित विविध ॲप विकसित करणे सोशल मीडियाद्वारे प्राचीन साहित्य लोकप्रिय करणे आणि बोली भाषेचा अभ्यास करून त्या वाचवणे यामध्ये तरुणांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे असा महत्त्वाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सागडे हे उपस्थित होते , तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा .डॉक्टर लक्ष्मीकांत येळवंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉक्टर मेहबूब सय्यद यांनी केले ,तर आभार प्रा.डॉक्टर मच्छिंद्र मालुंजकर यांनी मानले . यावेळी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. अमन बगाडे, डॉ.नवनाथ मेठेकर, डॉ.वैशाली भालसिंग ,प्रा. निलेश लंगोटे प्रा.आनंदा गडदरे , प्रा.गणेश निमसे ,प्रा. सुखदेव लोखंडे ,प्रा.विजया कोळेकर , प्रा.भागवत ठाकूर ,प्रा. डमाळे अनिकेत, प्रा. सचिन धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते..




