
भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या पंचांग स्थितीतून येणाऱ्या वर्षाचा अंदाज बांधला जातो. ज्योतिषशास्त्रीय गणना आणि पंचांगानुसार, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यावेळच्या ग्रहस्थितीवरून संक्रांतीचे स्वरूप ठरते. २०२६ ची संक्रांत ही अनेक अर्थांनी विशेष ठरणार आहे.
संक्रांतीचे वाहन आणि स्वरूप:
पंचांगानुसार यंदाच्या संक्रांतीचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल..
1) नाव: यंदाची संक्रांत ‘नंदा’ या नावाने ओळखली जाईल.
2) वाहन: संक्रांत घोड्यावर (अश्व) स्वार होऊन येत आहे.
3) उपवाहन: तिचे उपवाहन सिंह आहे.
4) वस्त्र : संक्रांतीने पिवळे (पीत) वस्त्र परिधान केले आहे.
5) शस्त्र : संक्रांतीच्या हातात ‘गदा’ हे शस्त्र आहे.
6) लेपन व वास: तिने कस्तुरीचे लेपन केले असून हातात जाईचे फूल आहे.
7) अवस्था: ती बसलेल्या स्थितीत आहे.
या रूपाचा अर्थ काय?
ज्योतिष अभ्यासकांच्या मते, संक्रांतीचे हे रूप देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे संकेत देते..
१. वस्त्र आणि महागाई: संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे सोने, हरभरा डाळ, हळद आणि पितळ यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. पिवळा रंग गुरु ग्रहाशी संबंधित असल्याने धार्मिक कार्यांवर खर्च वाढेल.
२. शस्त्र आणि गती: हातात ‘गदा’ असणे हे शिस्त आणि संघर्षाचे प्रतीक आहे. शत्रू राष्ट्रांवर वचक निर्माण होईल. तसेच वाहन ‘घोडा’ असल्याने जगात राजकीय आणि तांत्रिक घडामोडींना प्रचंड वेग येईल.
३. बसलेली स्थिती: संक्रांत बसलेल्या अवस्थेत असल्याने व्यापारी वर्गासाठी हे वर्ष स्थिरतेचे असेल. सुरुवातीच्या चढ-उतारानंतर बाजारपेठेत स्थिरता येईल.
४. दिशा: संक्रांत दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जात आहे, ज्यामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये सुबत्ता आणि प्रगती पाहायला मिळेल.
१२ राशींवर होणारा परिणाम
फायदा होणाऱ्या राशी: मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी ही संक्रांत भाग्योदयाची ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
मध्यम फल: वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल.
सावधगिरी: कर्क आणि मकर राशीच्या लोकांनी आरोग्याची आणि प्रवासाची काळजी घ्यावी.




