पैसा ही एक ‘ऊर्जा’ आहे. तुम्ही ज्या भावनेने ती ऊर्जा बाहेर सोडता, तशीच ऊर्जा तुमच्याकडे परत येते.
धन-संपत्ती आणि पैशांबद्दलच्या सकारात्मक दृष्टिकोनावर आधारित एक प्रेरणादायी विचार..

जो सांगतो की पैसे देताना किंवा खर्च करताना आनंद आणि सकारात्मक भावना ठेवल्यास लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते, तर नकारात्मकता आणि टाळाटाळ केल्यास आर्थिक अडचणी येतात; हा दृष्टिकोन सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देतो आणि पैशांशी जोडलेल्या मानसिकतेबद्दल मार्गदर्शन करतो..
काही महत्त्वपूर्ण टिपणी…
1) जो दुसऱ्यांना पैसे देताना रडतो टाळाटाळ करतो त्याला स्वतःलाही लक्ष्मी मिळताना तसेच रडावे लागते. कधीही हाताखालच्या लोकांचे पैसे देताना रडू नका. वेळेवर पैसे द्या.
2) जो सतत खूप जास्त लोकांना रडवतो , त्याला कुठल्या ना कुठल्या व्यवहारात भुर्दंड सोसावा लागतो.
3) जो खर्च करताना खुशीने खर्च करतो त्याच्याकडे लक्ष्मी हसत हसत येते कारण लक्ष्मी चंचल आहे तिला बांधून ठेवलेले आवडत नाही.
4) जो कायम पैशा संबंधी नकारात्मक बोलतो जसे की माझ्याकडे पैसे नाहीत, माझे पैसे संपले त्याला बरेचदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
5) ज्याची, खर्च करताना ही मनात “आपल्याकडे पुष्कळ पैसे आहेत” अशी भावना ठाम असते त्याच्याकडे खर्च केल्या केल्या पुन्हा काहीही कारणाने लक्ष्मी परत परत येते. या सगळ्यामागे सकारात्मकता आहे.




