ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघांच्या वतीने एक हात मदतीचा पूरग्रस्तांसाठी

सोलापूर

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीने वडवळ येथील 24 कुटुंबांना आणि रामहिंगणी येथील 76 कुटूंबांना असे 100 कुटूंबियासाठी गहू , तांदुळ, तेल, साखर, चहा पावडर तुरडाळ आणि बिस्कीट चे पुडे असे 50 हजार रूपयांचे अन्नधान्य किट नदीकाठच्या शेतावरच्या बांध्यावर जाऊन वाटप करण्यांत आले.

यासाठी राॅबीनहूड आर्मीचे हिंदुराव गोरे आणि त्यांचे टिम यांनी दोन दिवस आदी प्रत्यक्ष वरील नदीकाठी जाऊन शेतक-यांशी चर्चा करून बाधीत गरजू शेतक-यांची नावांची यादी आधारकार्ड सह घेऊन आले. आणि दोन दिवसांनी पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीने आणि राॅबीनहूड आर्मीच्या सहकार्याने 407 ट्रक मधून समक्ष नदीकाठच्या शेताच्या बांधावर नेऊन अन्नधान्य किट वाटप केले.

अन्नधान्य किट वाटप उपाध्यक्ष अनिल कन्ना, सचिव यशवंत इंदापुरे, कार्यकारी सदस्य अनिल कुमार जन्यारम,उमापती मिठ्ठापल्ली, शाम बेनगिरी, व्यंकटेश बिटला ,वासुदेव इप्पलपल्ली, भुलिंगम रापेल्ली, दशरथ इंदापुरे, हिंदूराव गोरे, बाबूराव गंधमल, देविदास मेरगू, सुशिलकुमार चिलका, प्रशांत गाजूल , नरेश गाजूल , सागर संभारम आदी मान्यवरांच्या उपस्थित केले.

संघाच्यावतीने एक हात मदतीचा पूरग्रस्तांसाठी संघातील अनेक सदस्य आणि समाजातील व्यापारी यांनी आर्थिक मदत केले त्यांचे सचिव यशवंत इंदापुरे यांनी आभार मानले आणि असेच सहकार्य सामाजिक कामासाठी मिळावे असे आवाहन केले.

संघाचे अनिल कन्ना,आयोजक उमापती मिठ्ठापल्ली , अनिलकुमार जन्यारम, शाम बेनगिरी आणि राॅबीनहूड आर्मीचे प्रमुख हिंदूराव गोरे आणि त्यांचे टिम यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे