ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात सात वर्षांपासून एकतर्फी प्रेमात अडकलेल्या ओमकार ज्ञानेश्वर सुपेकर याचा धक्कादायक प्रकार…

लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून सात वर्षांपासून एकतर्फी प्रेमात अडकलेल्या तरुणाने तरुणीचा मानसिक छळ करत तिला आणि कुटुंबीयांना पिस्तुलाचा फोटो दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित २७ वर्षीय तरुणी ही वाणी नगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. २०१७ साली ओमकार ज्ञानेश्वर सुपेकर याच्याशी तिची ओळख झाली होती.

काही काळ मैत्रीचे नाते असले तरी २०२० पासून ओमकारने तिला जबरदस्तीने लग्नासाठी त्रास देणे सुरू केले. तरुणीने प्रस्ताव नाकारताच आरोपीने तिला शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली.

मोबाइल नंबर ब्लॉक केल्यानंतर तो विविध नंबरवरून कॉल करत त्रास देत असे. त्याने पिस्तुल हातात घेतलेल्या फोटोंद्वारे लग्न कर, नाहीतर परिणाम वाईट होतील असे मेसेजही बीहिणीच्या मोबाईलवर पाठवले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे