ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कर्ज काढून माल, कामगाराचे पगार, दुकानाचे भाडे लाईट गेल्यास भरायचे कसे – शिव राष्ट्र सेना

महावितरण ने बाजारपेठेतली लाईट घालवल्यास सोमवारी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल - विजय पितळे

अ.नगर शहरात काल शनिवार सकाळी नऊ वाजल्यापासून तसेच रात्री उशिरापर्यंत लाईट न आल्याने कापड बाजार व्यापारी हवालदिल झाल्याने महावितरण कार्यालयात धाव घेतली.

यावेळी कार्यालयात कुठलाही कर्मचारी व अधिकारी नसल्याने व्यापारी व नागरिकांचा संताप पहाता तोंडावर दिवाळी आली असल्याने दिवस दिवसभर लाईट गेलेली असल्यामुळे आधीच बाजारपेठ उध्वस्त झालेली आहे .

त्यात लाईट गेल्यामुळे खरेदी करणारे ग्राहक बाजारपेठेत येऊन मागं जात आहे. यात व्यापाऱ्याने दुकानाचे भाडे कामगारांचा पगार तसेच कर्ज काढून माल खरेदी केलेला असल्याकारणाने हे कर्ज फेडायचे कसे महावितरणचे लाईटीचे बिल वेळेचे वेळेला भरून सुद्धा महावितरण दिवस दिवस लोड शेअरिंग करते. तरी या पुढील काळात महिनाभर लाईट घालू नये अन्यथा सोमवारपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे शिवराष्ट्र सेना व्यापारी आघाडीव असोशियन अध्यक्ष विजय पितळे यांनी इशारा दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे