ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयातील अधीकाऱ्याने कक्ष सेविकेला केली शरीर सुखाची मागणी

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्याने कक्ष सेविकेला रुग्णालयातील महिला अधिकारी व एक महिला परिसेविका यांच्या मार्फत शारीरिक सुखाची मागणी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिल्हा रुग्णालय येथील डॉ. साहेबराव डवरे असे या प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पीडित कक्ष सेविकेने शासनाच्या 104 या पोर्टलवर दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार देखील दाखल केली आहे.

याबाबतीत प्रशासकीय यंत्रने कडून सबंधित प्रशासकीय अधिकाऱ्या बाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही.या संदर्भात राजकीय दबावाखाली कारवाई होत नसल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी दबक्या आवाजात बोलत आहेत. याबाबतीत पीडित कक्षसेविका गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

डेप्युटी डायरेक्टर श्री. आहेर (नाशिक ) हे दिनांक 3ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयात आले असतांना त्यांना याबाबत विचारणा केली असता, या प्रकरणी योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

एकंदरीतच जिल्हा आरोग्य यंत्रणेला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रकरणाकडे फक्त आरोग्य विभागाचेच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे