
अहिल्यानगर लोककलांचा प्रगल्भ वारसा असलेल्या आपल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी, यासाठी बालरंगभूमी परिषदेने स्वतःची एक स्वतंत्र भूमिका स्वीकारली आहे. केवळ महोत्सवी किंवा मनोरंजनात्मक असे स्वरुप न ठेवता ही लोकचळवळ व्हावी..
लोककलांची माहिती व महती बालकांपर्यंत पोहचवितांना गायन, वादन, नृत्य क्षेत्रात ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन, लोककलेबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे “जल्लोष लोककलेचा” महोत्सव १६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला ..
या महोत्सवात लोकनृत्य (समूह/एकल), लोकगीत (समूह/एकल), लोकवाद्य (एकल) प्रकारांचा समावेश असेल. प्रत्येक कलाप्रकाराचे स्वतंत्र सादरीकरण अपेक्षित असून सादरीकरण कालमर्यादा समूह लोकनृत्य व समूह लोकगीतासाठी कमीतकमी ६ मिनिटे ते ८ मिनिटे तर एकल साठी ३ मिनिटे ते ५ मिनिटे कालमर्यादा असेल.
समूह/सांघिक सादरीकरण करणाऱ्या संघात किमान ६ व जास्तीत जास्त १० बालकलाकार असणे आवश्यक आहे.
या महोत्सवात वय वर्ष ६ ते १५ वर्षाच्या बालकांना सहभागी होता येईल असे परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रसाद भणगे यांनी सांगितले.




