
तुळशीबाग या लेडीज शॉपीच्या उद्घाटनासाठी माननीय खासदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या पत्नी राणीताई निलेश लंके प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
त्याचबरोबर कार्यक्षम नगरसेवक योगीराज गाडे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या कन्या नगरसेविका ज्योतीताई गाडे, नगरसेविका दिपाली ताई बारस्कर, नगरसेवक निखिल वारे, जिल्हा परिषद सदस्या नंदाताई दत्तात्रय वारे, जिल्हा परिषद सदस्य अनिताताई बाळासाहेब हराळ, उद्योजक अशोक बोठे, महापालिका आयुक्त भालसिंग साहेब, अमोल कांडेकर, चंद्रकांत पवार,दत्ताशेठ कातोरे पा. इ. मान्यवर वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल तुळशीबाग टीम, प्रगती उद्योग समूह, ठोंबरे परिवाराच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले..
महिलांची खरेदी साठी आवडती पुण्याची तुळशीबाग आता आपल्या नगरमध्ये पाईपलाईन रोड, एकविरा चौक येथे सुरू झाली आहे.
जिथे महिलांच्या सौंदर्याला साजेसे सर्व काही स्वस्त आणि मस्त दरामध्ये उपलब्ध होणार आहे. इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक, बॅग व पर्स, फ्लॉवर ज्वेलरी, रेंटल ज्वेलरी ची सर्व पुणे सारखी मॉर्डन, अँटिक ज्वेलरी एकाच ठिकाणी नगरच्या तुळशीबागेत मिळणार आहे.
हळदी, डोहाळे जेवण, तसेच लग्न समारंभ या करता लागणारी सर्व हेवी ज्वेलरी रेंट वर सुद्धा तुळशीबागेत उपलब्ध आहे.
टेंड्री पर्स, मेकअप रिलेटेड कॉस्मेटिक, रजवाडी ज्वेलरी व महिलांना लागणाऱ्या खूप साऱ्या प्रॉडक्ट वर ओपनिंग निमित्त खरेदीवर 5 ते 20% ऑफर चालू असल्यामुळे महिलांनी खरेदीचा मनसोक्त आनंद घ्यावा..
अशी विनंती तुळशीबागेच्या संचालिका सौ. कीर्ती संदीप ठोंबरे, सुजाता ठोंबरे, मीनाक्षी ठोंबरे, सोनाली ठोंबरे यांनी केली.