कोणत्या वस्तूंवर किती GST कमी झालाय ? एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादी – काय महाग, काय स्वस्त?

केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिवाळीपूर्वी भेट दिली आहे. बुधवारी नवी दिल्ली येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या अंतर्गत, कर स्लॅब कमी करण्यात आला, ज्यामुळे सर्व वस्तूंवरील कराचे दर कमी होतील.
नवीन दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. नवीन जीएसटी सुधारणा अंतर्गत, 100 हून अधिक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. यामध्ये, जीवनावश्यक वस्तू, दैनंदिन वस्तू, कृषी उत्पादने आणि आरोग्य उत्पादनांवर कराचे दर कमी करण्यात आले आहेत.
त्याचवेळी, लक्झरी वाहने, तंबाखू उत्पादने, कॅफिनेटेड पेये आणि अगदी क्रिकेट सामन्याच्या तिकिटांवरही कर वाढवण्यात आला आहे. नवीन जीएसटी सुधारणा अंतर्गत काय स्वस्त झाले आहे आणि काय महाग झाले आहे याची संपूर्ण यादी येथे वाचा..
दैनंदिन गरजेच्या वस्तू
वस्तू पूर्वी आता..
केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, साबण, टूथ ब्रश, शेव्हिंग क्रीम 18 टक्के – 5 टक्के
लोणी, तूप, चीज, दुग्धजन्य पदार्थ, ड्रायफ्रूट्स 12 टक्के – 5 टक्के
पनीर 5 टक्के शून्य
पॅकेज नमकीन, भुजिया 12 टक्के – 5 टक्के
भांडी, शिवणयंत्र व त्याचे भाग 12 टक्के – 5 टक्के
बाळासांठीच्या बाटल्या, नॅपकीन व डायपर्स 12 टक्के – 5 टक्के
शेतकरी आणि कृषी क्षेत्र
ट्रॅक्टर टायर व भाग 18 टक्के – 5 टक्के
ट्रॅक्टर 12 टक्के – 5 टक्के
ठराविक जैव कीटकनाशके, सूक्ष्म पोषकद्रव्ये 12 टक्के – 5 टक्के
ठिबक सिंचन प्रणाली व स्प्रिंकलर 12 टक्के – 5 टक्के
कृषी, बागायती, वनीकरणासाठी यंत्रे (जमीन तयार करणे, पेरणी, कापणी) 12 टक्के – 5 टक्के
आरोग्य क्षेत्र
वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा 18 टक्के – शून्य
तापमापक 12 टक्के – 5 टक्के
वैद्यकीय दर्जाचे ऑक्सिजन शून्य
सर्व निदान किट्स 12 टक्के – 5 टक्के
ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स 12 टक्के -5 टक्के
चष्मे 12 टक्के – 5 टक्के
वाहनं
पेट्रोल-एलपीजी-सीएनजी हायब्रिड कार
(1200 सीसी व 4000 मिमीपर्यंत)
28 टक्के 18 टक्के
डिझेल हायब्रिड कार (1500 सीसी व 4000 मिमीपर्यंत) 28 टक्के 18 टक्के
तीन चाकी वाहने 28 टक्के 18 टक्के
मोटरसायकल (350 सीसीपर्यंत) 28 टक्के 18 टक्के
मालवाहू मोटर वाहनं 28 टक्के 18 टक्के
शिक्षणही झालं स्वस्त
नकाशे, चार्ट्स, ग्लोब 12 टक्के शून्य
पेन्सिल, शार्पनर, खडू, रंगीत पेन्सिली 12 टक्के शून्य
वह्या व नोटबुक्स 12 टक्के शून्य
रबर 5 टक्के शून्य
इलेक्ट्रॉनिक उपकरणं, घरांसाठी दिलासा
एअर कंडिशनर टीव्ही (32 इंचापेक्षा जास्त, एलईडी, एलसीडी) 28 टक्के 18 टक्के
सिमेंट 28 टक्के 18 टक्के
मॉनिटर्स व प्रोजेक्टर, डिशवॉशिग मशीन 28 टक्के 18 टक्के
1) जीएसटी सुधारणा कधी लागू होतील?
उत्तर: जीएसटी परिषदेच्या ५६व्या बैठकीत (३-४ सप्टेंबर २०२५) घेतलेल्या निर्णयानुसार, नवीन कर दर २२ सप्टेंबर २०२५ पासून (नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून) लागू होतील.
2) जीएसटी सुधारणांचा उद्देश काय आहे?
उत्तर: कर संरचना सुलभ करणे.
सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीयांना कर सवलतीद्वारे आर्थिक दिलासा देणे.
एमएसएमई आणि उद्योगांना प्रोत्साहन देऊन आत्मनिर्भर भारताला चालना देणे.
कर वर्गीकरणातील त्रुटी आणि विवाद कमी करणे.
कर अनुपालन प्रक्रिया सुलभ करणे.
3) जीएसटी परिषदेची भूमिका काय आहे?
उत्तर: जीएसटी परिषद, ज्याचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री आहेत आणि यात सर्व राज्यांचे अर्थमंत्री सामील असतात, जीएसटी दर, नियम, आणि सुधारणांबाबत निर्णय घेते. ५६व्या बैठकीत (३-४ सप्टेंबर २०२५) या सुधारणांना अंतिम मान्यता देण्यात आली.