ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

450 कोटींच्या घोटाळ्यात गुंतवणूकदारांना गंडा,नगरमध्ये फिर्यादीच निघाला आरोपी

अहिल्यानगर

सुपा (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सुमारे 450 कोटी रूपयांच्या ‘ट्रेडझ ईन्वेस्टमेंट’ कंपनी फसवणूक प्रकरणात धक्कादायक कलाटणी झाली आहे.

ज्याने सुरूवातीला फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदवून घेतला, तोच फिर्यादी एजंट विनोद बबन गाडीळकर याच्यासह कुटुंबातील तिघे आता संशयित आरोपी ठरले आहेत.

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी न्यायालयासमोर हे धक्कादायक वास्तव मांडले.

विनोद गाडीळकर याच्यासह विक्रम बबन गाडीळकर, पूजा विक्रम गाडीळकर व प्रमोद बबन गाडीळकर अशी चौघांची नावे संशयित आरोपींमध्ये समाविष्ट झाली आहेत.

तपासातून समोर आले आहे की, गाडीळकर कुटुंबाने स्वतः गुंतवणूक करूनच थांबले नाही, तर इतर गुंतवणूकदारांना प्रलोभन देऊन कंपनीत पैसा गुंतवण्यास भाग पाडले. परिणामी हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये अडकले. कंपनीने शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले.

पंचतारांकित हॉटेलांमध्ये आकर्षक सेमिनार्स, प्रेझेंटेशन्स, बनावट सेबी परवाने आणि बँक खात्यांचे दाखले वापरून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला.

गाडीळकर याला इतरांना गुंतवणूक जोडल्यास 50 टक्के नफा देण्याचे वचन देण्यात आले. त्याने स्वतः 5 लाख 10 हजारांची गुंतवणूक करून आपल्या मित्रपरिवारालाही यात ओढले. सुरूवातीला परतावा वेळेवर मिळत होता. मात्र नोव्हेंबर 2024 पासून तो टप्प्याटप्प्याने कमी होत गेला आणि मे 2025 मध्ये केवळ 1.8 टक्क्यांवर आला.

दरम्यान, एप्रिल 2025 पासून गुंतवणूकदारांच्या परवानगीशिवाय सर्व खाती आयएफ ‘ग्लोबल ट्रेडींग लिमिटेड’ या नव्या पोर्टलवर स्थलांतरीत करण्यात आली. गुंतवणुकीची रक्कम यूएसडीटीमध्ये शिफ्ट करून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे