ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सिताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धा उत्साहात

शिरूर पुणे

सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म / बी. फार्म / एम. फार्म), शिरूर येथे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (IPA) आळेफाटा लोकल ब्रांच व नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (NPWA), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली.

या स्पर्धेत राज्यभरातील ३८ फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली कल्पकता, संशोधनवृत्ती व शास्त्रीय दृष्टिकोन सादर केला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डि. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा, बी. व एम. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे, एस. टी. सी. ओ. पी. एन. ॲल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबाजी गलांडे, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष ॲड. सचिन कोतवाल, जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसर येथील प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकऱ, गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ फार्मसी, वाघोली येथील प्राचार्य डॉ. तुषार शेळके, डॉ. जयप्रकाश सूर्यवंशी व शितल खंडागळे मॅडम उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे व डॉ. अमोल शहा यांच्या स्वागतपर भाषणानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फार्मसी क्षेत्रातील संशोधन, नाविन्यपूर्ण संकल्पना, आधुनिक औषधनिर्मिती प्रक्रिया व व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्मार्ट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, नियंत्रित औषध मुक्तता प्रणाली, बायोटेक्नॉलॉजी व फार्मास्युटिकल उपकरणे यांवर आधारित विविध मॉडेल्स सादर केली. स्पर्धेचे सूत्रसंचालन विजया पडवळ व निशा केसकर यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शंकर ढोबळे, प्रा. मोहन शितोळे, प्रा. विशाल कारखिले व प्रा. मानसी गरदरे होते.

स्पर्धेचा निकाल.

बी. फार्मसी व एम. फार्मसी विभागात..

प्रथम पारितोषिक – सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर – रिया अग्रहरी व प्रणव बडगुजर

द्वितीय पारितोषिक – विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे – ओम खैरे व केतकी गोमसे

तृतीय पारितोषिक – AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे – अनुष्का साकोरे व तानिया घाणेकर

उत्तेजनार्थ पारितोषिक – प्रवरा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी, लोणी – अंजली पवार व तृप्ती सोमवंशी.

डि. फार्मसी विभागात..

प्रथम पारितोषिक – विशाल जुन्नर सेवा मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आळे – श्रद्धा चौधरी व तन्मय चव्हाण

द्वितीय पारितोषिक – अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर – पूर्वा गोरे व भाग्यश्री गुट्टेरकर

तृतीय पारितोषिक – मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी, विरगाव – ऋषिकेश शेळके

उत्तेजनार्थ पारितोषिक – सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डि. फार्म), शिरूर – जगदाळे अनुश्का व थोरात श्रेया

प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १५००/-, १०००/-, ७००/- रुपये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. विजया पडवळ व प्रा. निशा केसकर यांनी केले. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणारी, तांत्रिक कौशल्यांना चालना देणारी आणि फार्मसी शिक्षण अधिक व्यावहारिक बनविणारी ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, आयोजक समिती, स्वयंसेवक तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ .राजेंद्रजी थिटे व सचिव श्री धनंजय थिटे, डॉ. हर्षवर्धन थिटे, श्री. शिवाजी पडवळ, प्रमुख पाहुणे, प्राचार्य व परीक्षकांनी सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती निर्माण करणारा व फार्मसी शिक्षण अधिक व्यावहारिक बनविणारा ठरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे