
काल महाराष्ट्रासह देशभरात विसर्जन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला.
अहिल्यानगर, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांत ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात, आणि गजर घोषणांनी विसर्जन मिरवणुका पार पडल्या.
“गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला”
“गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या”.. या घोषणांनी वातावरण भारून गेलं.
यंदा भक्तांनी इको-फ्रेंडली मूर्तींना प्राधान्य दिलं –शाडू मातीच्या मूर्ती
कृत्रिम तलावात विसर्जन…
प्लॅस्टिक व रंगांचा वापर टाळला..
दरम्यान, श्रद्धा, भक्ती, पर्यावरणपूरकता आणि उत्सवाचा उत्साह – अशा चौकटीत बाप्पाला निरोप देत लाखों भक्तांनी “पुढच्या वर्षी लवकर या” अशी आर्त हाक दिली.