
सफारी बुकिंग करणार्या एजन्सी विरोधात गुन्हा दाखल…
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंग करणार्या एजन्सीने सुमारे १२ कोटी १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन या सफारी बुकिंग करणार्या एजन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करार नाम्यानुसार तीन वर्षांमध्ये एकूण २२,८०,६७,००० देय रकमेपैकी केवळ १०,६५,००,००० रकमेचा भरणा या एजन्सीने केला आहे. तर उर्वरित १२ कोटी १५ लाख रुपयांसाठी वारंवार पाठपुरावा करुनही उपयोग झाला नाही.
त्यामुळे एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.