ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शिवजन्म सोहळ्यायानिमित्त २२४ रक्तदात्यास “स्मार्ट वॉच” चे वाटप 

पुणे

सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही तिथीनुसार दि. १७ मार्च २०२५ रोजी शिवराज्य प्रतिष्ठाण, छत्रपति शिवाजी महाराज रोड, पुणे तर्फे शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..

खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा आम्हा सर्व शिवभक्तांसाठी एक मोठा सणच असतो ज्याची आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत असतो, यंदा प्रतिष्ठानचे हे १८वे वर्ष आहे . आपण दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करतो, प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात.

अत्तापर्यंत शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ५००० पेक्षा जास्त रक्तपिशव्याचे संकलन करण्यात आलेले आहे तसेच वेळोवेळी गरजूंना मदत देखिल करण्यात आली आहे.

सकाळी ७:३० वा शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानास प्रारंभ झाला, जवळ जवळ २२४ रक्तदात्यांनी या रक्तदानात सहभाग नोंदवला प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास भेटवस्तू स्वरूपात आपण “डिजिटल स्मार्ट वॉचचे” वाटप केले.

तसेच दुपारी १२ वा शिवजन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला, यामध्ये प्रतिष्ठाणच्या असंख्य महिला कार्यकर्त्यांनी पेढे वाटून शिवजन्म साजरा केला, यावर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून “इतिहासाची शौर्यगाथा” म्हणजेच शिवकालीन नाणी आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनात शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच सायं ७ वाजता बाल-शिवभक्तांसाठी बहुचर्चित “छावा” या चित्रपटाचे आयोजन केले होते मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी सहभाग घेतला आणि अल्पोपहार करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी मा. दीपक (बाबा) मिसाळ यांनी आवर्जून उपस्थित राहून कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच सर्वश्री मा नगरसेवक मनोजसाहेब देशपांडे, विष्णु हरीहर, उमेश अण्णा चव्हाण, राजेंद्र काकडे, सतीश मोहोळ, दिलीप काळोखे,बापू मानकर, बाप्पू नाईक, सौरभ बाळासाहेब अमराळे, शिरीष मोहिते प्रणव गंजीवाले आदी मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष लतिश शिंदे, उपाध्यक्ष प्रसाद तेलंग, कार्याध्यक्ष आशिष हिंगमिरे, प्रशांत मोरे, राहुल फटाले, अविनाश करंजावणे या प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे