ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’.. जिल्ह्याचे नाव राहणार तेच.. सरकारी आदेश जारी

अहिल्यानगर

अहमदनगर शहराचे नाव बदलून ते अहिल्यानगर असे करण्याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे..

अहमदनगर शहराचे नाव बदलून ते अहिल्यानगर असे करण्याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. जिल्ह्याचे नाव अहमदनगर असेच राहणार आहे.

शासनाचे उपसचिव दि. ब. मोरे यांच्या नावाने ४ ऑक्टोबर रोजी हे राजपत्र प्रकाशित झाले आहे. अहमदनगर शहराच्या नामकरणास गृह मंत्रालयाने १ ऑक्टोबर रोजी अनुमती दिली. त्यानुसार या अधिसूचनेद्वारे अहमदनगर शहराचे नाव बदलून ते ‘अहिल्यानगर, तालुका व जिल्हा अहमदनगर’, असे करण्यात येत आहे, असे या राजपत्रात म्हटले आहे.

असाधारण क्रमांक ११२ या क्रमांकाने हे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. या राजपत्रानुसार अहमदनगर शहराचे नाव आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाईल. मात्र जिल्ह्याचे नाव हे अहमदनगर असेच राहणार आहे.

जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नामकरण करण्याची घोषणा केली होती त्यानुसार शासनाने हे राजपत्र प्रसिद्ध केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे