ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर जिल्ह्यात 20 पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या..

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात अकार्यकारी पदावर बदली केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अशा 20 अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करून त्यांना पोलीस ठाणे देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती मुळुक यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना अर्ज शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे टीएमसीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान, त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

बदली करण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षकांची नावे, कंसात सध्याचे नेमणुकीचे व बदली नंतरचे ठिकाण (पोलीस ठाणे) पुढील प्रमाणे – 

कल्पना चव्हाण (नेवासा ते तोफखाना), विकास काळे (कोतवाली ते संगमनेर), कुणाल सपकाळे (अर्ज शाखा ते कोतवाली), विवेक पवार (वाचक, अपर अधीक्षक कार्यालय, अहिल्यानगर ते राहुरी), एकनाथ ढोबळे (वाचक, अपर अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर ते श्रीरामपूर तालुका), कल्पेश दाभाडे (वाचक, उपअधीक्षक कार्यालय, संगमनेर ते घारगाव), संदीप हजारे (वाहतुक शाखा, शिर्डी ते अकोले), अमोल पवार (नव्याने हजर ते नेवासा), पोलीस उपनिरीक्षक : महेश शिंदे (जिविशा, अहिल्यानगर ते संगमनेर तालुका), योगेश शिंदे (भिंगार कॅम्प ते राहाता), पल्लवी वाघ (संगमनेर तालुका ते भिंगार कॅम्प), गजेंद्र इंगळे (वाचक, अहिल्यानगर शहर उपअधीक्षक कार्यालय ते भिंगार कॅम्प), उमेश पतंगे (टीएमसी, अहिल्यानगर ते नगर तालुका), ज्योती डोके (नियंत्रण कक्ष ते राहुरी), सज्जन नार्‍हेडा (नियंत्रण कक्ष ते कर्जत), दीपक पाठक (वाचक, उपअधीक्षक कार्यालय, शेवगाव ते शनिशिंगणापूर), निवांत जाधव (व्हीआयपी प्रोटोकॉल, शनिमंदिर, शनिशिंगणापूर ते शिर्डी), सतीष डौले (वाचक, उपअधीक्षक कार्यालय श्रीरामपूर ते श्रीरामपूर तालुका), विक्रांत कचरे (वाहतुक शाखा, शिर्डी ते शिर्डी पोलीस ठाणे).

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे