ऑर्गा स्किन प्रोडक्ट्स च्या संचालिका भाग्यश्री ताई यांच्या शी दिलखुलास गप्पा
अहमदनगर

मी भाग्यश्री खांडरे. राहणार-अहमदनगर.
माझा व्यवसाय- ऑर्गास्किन प्रोडक्ट्स (नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने)
माझ्या व्यवसायाची सुरुवात काही खास आणि ठरवून झाली नाही. माझ लग्न 2008 साली झाले. मी एकत्र कुटुंबात राहते. घरची जबाबदारी सांभाळत असताना मी काही तरी करायचे. म्हणून ब्यूटी पार्लर चा कोर्स केला.पण घरच्या जबाबदाऱ्या मधून सुटका मिळेल तेव्हा मी पार्लर चालवू शकेल. घरातुन कुठलाच सपोर्ट मिळत नाही. तिथून सुरुवात झाली.की स्वतः साठी वेळ द्यायला पाहिजे. आणि मला आवड होती सुंदर दिसण्याची.कारण माझ्या मैत्रिणीं मला सतत बोलायच्या भाग्यश्री कशी राहते तु. मग हळूहळू मुलगी ही बोलायला सुरुवात झाली.मग मी ठरवले की आपण नैसर्गिक प्रसाधने बनवायला. हळूहळू युट्युब वर बघुन मी प्रोडक्टस बनवत गेले.
आणि मग नातेवाईक, मैत्रिणी मध्ये दयायला लागले. कस्टमर ला प्रोडक्ट आवडतं आहे. पण पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसे शेवटी माउथ टू माउथ किती सांगणार. आणि लोक मार्केट मधले केमिकल चे प्रोडक्ट वापरतात.घरगुती व्यवसायाला कोण विचारतं???
भाग्यश्री ताई पुढे म्हणाले की माझ्या कडे तुम्हाला सगळं काही नॅचरल प्रोडक्ट्स मिळेल. ऑल इन वन केसांच्या कोणत्याही समस्येवर तेल,तसेच त्वचे साठी खास आकर्षक असलेले स्क्रब. पण तुमच्या त्वचेचा पोत लक्षात घेता डे , नाईट क्रीम, जेल, डार्क रिंकल्स, अंडर आय क्रीम, वाईन, डि ट्यान, बदाम केशर, गुलाब. तसेच साबण ही मुलतानी माती, नीम वेगळे वेगळे फेशियल किट अजुन खुप काही तुम्हाला क्रीम पाहायला मिळेल.
तसेच कस्टमर मागणी नुसार तुम्हाला कुठलेही केमिकल न वापरता प्रोडक्ट्स मिळतील.
विशेष टीप– कुठलेही केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाही त्यामुळे तुम्ही 13 वर्षे पुढे मुलांना हे वापरले तरी चालेल.
AR न्युज च्या मुख्य संपादिका श्रुती ताईंच्या माध्यमातून आम्हाला घरगुती व्यवसाय करणार्या महिलांना नक्की च हक्काचे व्यासपीठ मिळेल अशी अपेक्षा करते.
हे प्रोडक्ट्स मिळण्याचे ठिकाण – माऊली उद्योग समूह, माळीवाडा, अशोक भाऊसाहेब फिरोदिया स्कूल समोर, अहमदनगर. मोबाईल नं. ७०८३०९२८४४