ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सावेडी कचरा डेपो येथे स्मशानभूमी… नागरिकांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण

अहिल्यानगर

सावेडी उपनगरामध्ये कचरा डेपोसाठी आरक्षित भूखंड पडला होता त्या ठिकाणी मनपाच्या वतीने देखील कचरा डेपो सुरू केला आणि सर्वत्र दुर्गंधी पसरली त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला मात्र यावेळी महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी पुढाकार घेत कचरा डेपो हलविण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला अखेर यश देखील आले. आणि आज सावेडी उपनगराचा स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला अनेक वर्षाची नागरिकांची मागणी पूर्ण झाली विविध जाती धर्मातील नागरिकांना या स्मशानभूमीचा उपयोग होणार आहे.

तृतीयपंथी नागरिकांच्या दफनभूमीसाठी शहरांमध्ये जागाच उपलब्ध नव्हती त्यांना आता अधिकृत जागा मिळाली आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

सावेडी कचरा डेपो इथे स्मशानभूमीचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे,नगरसेविका मीनाताई चव्हाण, शिवाजी चव्हाण, माजी नगरसेवक सतीश बारस्कर, काजल गुरु, नाथाभाऊ कराळे, दिलीप बारस्कर, बाबासाहेब बारस्कर , गणेश बारस्कर , लैला शेख , सपना शेख, संध्या शेख, किरण नेटके, मनोज काळे, सचिन काळे, अशोक काळे, राजू काळे, रामदास काळे, सुरेश काळे, सतीश काळे, जीवन चंदन, सावंत काळे, प्रशांत काळे, प्रदीप काळे, सविता काळे, छायाताई नवले, सागर काळे, विशाल काळे, योगेश काळे, करुणा काळे, वर्षा जाधव विकी भोसले, भापकर काळे मुकेश काळे, राहुल काळे, तुषार चव्हाण आदी उपस्थित होते

माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर म्हणाले की, सावेडी उपनगराचा अनेक वर्षाचा स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून कचरा डेपोच्या जागेत सर्व जाती धर्मातील लोकांसाठी स्मशानभूमी तयार होत असून यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, तृतीयपंथी, कोल्हाटी, पारधी समाजाला देखील या स्मशानभूमीमध्ये जागा देण्यात आली आहे.

महापालिकेत कचरा डेपोचा ठराव रद्द करून स्मशानभूमी, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल, गार्डन यासाठी ठराव करण्यात आला आहे स्मशानभूमीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काजल गुरु म्हणाल्या की, तृतीय पंथीयांची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती ती मार्गी लागावी यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला आणि आमदार संग्राम जगताप यांनी मार्गी लावून दिली असून आम्हाला आत्ता हक्काची जागा मिळाली आहे, कब्रस्ताने, गार्डन नसून दुःखाची जागा आहे. यापूर्वी आम्हाला शहरांमध्ये कुठेही जागा नसल्यामुळे अंत्यविधी वेळी मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते आता तो प्रश्न मार्गी लागला आहे असे त्या म्हणाल्या..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे