ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तारकपूर, पुणे बसस्थानकात होणार काँक्रीटीकरण, निधीसाठी ‘एमआयडीसी’कडून कर्ज

अहमदनगर

अहमदनगर शहरात अनेक समस्या आहेत. परंतु सध्या आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या अनेक समस्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत.

भरपूर निधी आणून विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. आता शहरातील तारकपूर, पुणे बसस्थानकात काँक्रीटीकरण होणार आहे. यासाठी आता तारकपूर बस स्थानकातील अंतर्गत काँक्रिटीकरणासाठी तीन कोटी २५ लाख, स्वस्तिक चौकातील बस स्थानक अंतर्गत काँक्रिटीकरणासाठी २ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

बसस्थानकांची दुरवस्था

तारकपूर व पुणे बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मोठमोठे खड्डे पडले असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू असून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे तारकपूर बस स्थानकातील अंतर्गत काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.

एमआयडीसी विभागातून निधी कर्जरुपी वर्ग

परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे बस स्थानक विकास कामासाठी अडचण निर्माण होत होती. याच कारणाने बस स्थानक सुशोभीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी एमआयडीसी विभागातून सुमारे ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाकडे कर्जरुपी वर्ग केला असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली आहे.

आता या निधीमधून तारकपूर बस स्थानक व स्वस्तिक चौक येथील पुणे बस स्थानक अंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईल. शहराच्या विकासात भर पडणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे