
प्रा.रतनलाल सोनग्रा यांनी अहमदनगर साहित्यिक वैभव ला आज भेट दिली.व अहमदनगर साहित्यिक वैभव चे शब्बीर शेख हे करत असलेल्या साहित्यिक सूची चे कौतुक केले.
अहमदनगर जिल्ह्यातील लेखक, संपादक, अनुवादक, संकलक अशा 2600 लोकांची व त्यांच्या 8200 साहित्य कृती पाहून अजूनही जे लोक सूची मध्ये नाहीत व जी पुस्तके सूचीत नाही त्या विषयी लोकांनी संपर्क करून पुस्तके द्यायला हवी असे उद्गार काढले .
पहिली सूची १३६८ पानी ए ४ साइज असून ती लवकरच प्रकाशित होणार आहे. दुसऱ्या सूची चे काम ही सुरू झाले आहे.