ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दुचाकी चोरीतील आरोपीस अटक

दुचाकी चोरीतील आरोपीस तात्काळ अटक करून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. येथील श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने नुकतीच ही कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी रामभरत शामबिहारी यादव यांची लाल रंगाची यूनिकॉर्न दुचाकी राहत्या घरुन चोरी केली.

याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

सदरचा गुन्हा शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख यांने केल्याचे निष्पण झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला.

तेव्हा सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सदरचा आरोपी चोरी केलेल्या मोटारसायकलवर बसून हुसेननगर वार्ड नंबर १कडे जात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलीस तपास पथकाने तात्काळ मदर टेरेसा चौकात सापळा लावला. सदरचा आरोपी हा रेल्वे पटरीकडुन हुसेननगरकडे येताना दिसला. तेव्हा तपास पथकाने त्यास ताब्यात घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे