ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कानिफनाथ महाराज देवस्थान प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाची वक्फ बोर्ड व मुसलमान गटांना कारणे दाखवा नोटीस

कानिफनाथ महाराज देवस्थान प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाची वक्फ बोर्ड व मुसलमान गटांना कारणे दाखवा नोटीस..

हिंदू धार्मिक हक्कांचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक पाऊल .. – महाराष्ट्र मंदिर महासंघ..

कानिफनाथ महाराज देवस्थान (गुहा, ता. राहुरी, जि. अहमदनगर) प्रकरणात हिंदू भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने देवस्थान प्रकरणात मुसलमान गटांना आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात गुहा ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे स्थानिक पदाधिकारी अन् भाविक यांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता (पूज्य) सुरेश कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. हा न्यायालयाचा आदेश हिंदू धार्मिक हक्कांचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाने म्हटले आहे.

प्रकरणाचा इतिहास

संत कानिफनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील एक महान संत होते. त्यांनी राहुरी तालुक्यातील गुहा येथे कठोर तपश्चर्या आणि ध्यानसाधना केली होती. त्यामुळे हे ध्यानस्थळ हिंदू भाविकांसाठी श्रद्धेचे ठिकाण असून येथे पूजा-अर्चा, आरती व धार्मिक विधी पार पडतात; मात्र काही मुस्लिम गटांनी आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाने मिळून या स्थळाला ‘हजरत बाबा रमजान शहा दर्गा’ असल्याचा दावा केला. महसुली अभिलेखांमध्ये फेरफार करून या स्थळावर मुस्लिमांची मालकी असल्याचा प्रयत्न करण्यात आला.

हिंदू भाविकांवरील अन्याय ..

हिंदू भाविकांना पूजेसाठी आणि गुरुवारी होणार्‍या धार्मिक विधींना आडकाठी आणली गेली. पौर्णिमेच्या उत्सवांवर बंधने घालण्याचा प्रयत्न झाला. पुजार्‍यांना धमकावले गेले आणि त्यांच्यावर हल्लेही झाले. हिंदू भाविकांना त्यांच्या धार्मिक स्थळावरून जबरदस्ती हुसकावण्याचा प्रयत्न झाला. या अन्यायाविरोधात गुहा ग्रामपंचायत आणि हिंदू भाविकांनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल (नागरी पुनरावलोकन अर्ज क्र. ४७/२०२५) केली. याचिकेत मागणी करण्यात आली की, कानिफनाथ महाराज देवस्थानावरील पूजा-अर्चेवरील बंदी उठवण्यात यावी. मुस्लिम गटांनी महसुली अभिलेखांमध्ये घुसडलेली बेकायदेशीर नोंद रद्द करण्यात यावी. मंदिरावरील कोणत्याही प्रकारची बंधने हटवण्यात यावीत. न्यायमूर्ती एस्. जी. चपळगावकर यांनी या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र वक्फ बोर्डाला आणि मुस्लिम गटांना ‘‘कारणे दाखवा नोटीस’’ बजावण्याचा आदेश दिला.

न्यायालयाच्या आदेशाचे महत्त्व ..

हिंदू धार्मिक स्थळांचे रक्षण करण्यासाठी मोठे यश मानले जात आहे. बेकायदेशीर महसुली फेरफार, तसेच कानिफनाथ महाराज देवस्थानवरील अन्यायकारक निर्बंध हटवण्यासाठी पुढील पाऊल पडले तर हिंदू भाविकांना त्यांच्या श्रद्धास्थळी पुन्हा निर्भयपणे पूजा-अर्चा करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. कानिफनाथ महाराज देवस्थान वाचवण्यासाठी धर्माभिमानी नागरिकांनी जागरूक राहावे व आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे महाराष्ट्र मंदिर महासंघाने म्हटले आहे.

आपला नम्र,

श्री. सुनील घनवट,

राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ, 

(संपर्क : ७०२०३८३२६४)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे