ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु – आ. जगताप

अहमदनगर

अनेक वर्षाचा तपोवन रोडच्या डांबरीकरण कामाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे, आज मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आहे, शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मोठा निधी प्राप्त होणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची कामे सुरु आहेत. सावेडी उपनगर भागातील विकासाच्या कामांना गती दिली असून आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्न ातून विविध विकासकामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे,नगरसेवक सुनील त्रिंबके, नगरसेविका मिना चव्हाण, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, अशोक ढवण, किसन कसबे, योगेश ठुबे, सतीश ढवण, स्वप्नील ढवण, प्रशांत निमसे, प्रशांत धाडगे, धीरज उकिर्डे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर म्हणाले की, प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे, नियोजनबद्ध कायमस्वरूपाची दर्जेदार विकासकामे करीत असल्यामुळे ही कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येणार नाही असे ते म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे