कोल्हापुरात काविळीची साथ

राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे काविळीचे पंधरा रुग्ण आढळले आहेत. कोल्हापुरात साथ वाढण्याच्या भीतीनं आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झालेले आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ साथ उद्भवली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळवले आहे.
ठिकपुर्ली येथे गेली अनेक दिवसांपासून कावीळ साथ सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांना जुलाब, उलटी, थंडी वाजून ताप येणे अशा शारीरिक समस्या सुरू झाल्या आहेत. यासर्वांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक वाढली आहे. सध्या गावात पंधरा रुग्ण बाधित असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत.
गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथल्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मैलामिश्रित पाणी प्याल्याने ही साथ पसरली
महत्त्वाचे मुद्दे –
कोल्हापुरात काविळीची साथ
राधानगरीतल्या ठिकपर्लीत आढळले १५ रुग्ण
रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक