ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरातील विनापरवाना फलक महानगरपालिकेने कारवाई करून हटवले

अहिल्यानगर

अनधिकृत फ्लेक्स प्रकरणी गुन्हे दाखल करणार; आयुक्त यशवंत डांगे यांचा इशारा

अहिल्यानगर  महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते. दंडही वसूल करण्यात आला होता. आता पुन्हा फलक हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, गुन्हेही दाखल करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनामार्फत सातत्याने आढावा घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक अशा ठिकाणी काही संस्था, नागरिक, व्यावसायिक आस्थापना, राजकीय कार्यकर्ते महानगरपालिकेची परवानगी न घेता फ्लेक्स बोर्ड लावत आहेत. महानगरपालिकेने अशा अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सुमारे ४० पेक्षा अधिक फलक कारवाई करून हटवण्यात आले आहेत. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे.

तसेच, महानगरपालिका क्षेत्रात फलक लावण्यासाठी नागरिक, संस्था, व्यवसायिक आस्थापना, राजकीय कार्यकर्त्यांनी रीतसर अर्ज करून व शुल्क भरून परवानगी घ्यावी. शहरात विनापरवाना फलक आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे