ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरातील विवाहितेवर अत्याचार..

अहिल्यानगर

अहिल्यानगर प्रेमदान चौकातील एका लॉजमध्ये एका 41 वर्षीय विवाहित महिलेला सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली.

सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पीडितेने धाडस करत एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत 19 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली.

त्यानुसार सोमनाथ शहाजी पाटोळे (रा. सोनई, ता. नगर, जि. अहिल्यानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2023 ते 6 ऑगस्ट 2025 दरम्यान आरोपीने पीडितेला वेळोवेळी धमकावून, भीती दाखवून तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. पीडितेचे छायाचित्र काढून तुझी बदनामी करेन,अशी धमकी देत ती सोशल मीडियावर आणि तिच्या पतीकडे फोटो पाठवण्याची भीती दाखवली.

कोणाला सांगितलेस तर तुला, तुझ्या पतीला आणि मुलींना जिवंत ठेवणार नाही,असेही आरोपीने तिला धमकावलेचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.अद्याप आरोपी फरार असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे