ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर देशातील अनेक बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केलेली आहे. अशा परिस्थितीत अनेकजण चांगल्या व्याजदर देणाऱ्या बँकांच्या शोधात आहेत.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफ डी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार आहे का मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

फिक्स डिपॉझिटमध्ये सीनियर सिटीजन ग्राहक अधिक पैसा गुंतवतात. कारण म्हणजे त्यांना एफ डी वर सामान्य ग्राहकांपेक्षा अधिकचे व्याज मिळते शिवाय त्यांना सुरक्षित ठिकाणीच गुंतवणूक करायची असते.

दरम्यान जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील कोणी सिनिअर सिटीजन ग्राहकाला फिक्स डिपॉझिट करायचे असेल तर तुमच्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया चा पर्याय बेस्ट ठरणार आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याजदर देते. ही बँक सामान्य ग्राहकांपेक्षा सीनियर सिटीजन ग्राहकांना अधिक व्याज देते. दरम्यान आज आपण बँकेच्या 399 दिवसांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

युनियन बँक ऑफ इंडियाची 399 दिवसांची FD योजना

खरंतर, गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया ने रेपो रेटमध्ये दोनदा कपात केली आहे. रेपो रेट आता सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी हेच रेट 6.50% पर्यंत होते.

बँकेकडून अजून एफडीच्या व्याजदरात कपात करण्यात आलेली नाही. यामुळे युनियन बँक ऑफ इंडिया फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांसाठी बेस्ट ऑप्शन ठरण्याची शक्यता आहे. युनियन बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर 3.50% पासून ते 7.80% पर्यंतचे व्याज ऑफर करते.

बँकेच्या 399 दिवसांच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ग्राहकांना 7% दराने परतावा दिला जातोय.

तसेच सिनिअर सिटीजन ग्राहकांना म्हणजे साठ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून 0.50 टक्के अधिकचा परतावा दिला जातोय. या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.50% दराने परतावा दिला जातोय.

अडीच लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?

सामान्य ग्राहकांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या 399 दिवसांच्या एप्रिल योजनेत अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर दोन लाख 69 हजार 702 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. तसेच सिनिअर सिटीजन ग्राहकांनी याच एफ डी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर दोन लाख 71,154 रुपये मिळणार आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे