ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यात व शहरांमध्ये आता रेशनिंग मध्ये येतोय प्लास्टिक तांदूळ

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी - लाखो गरीब लोकांचे मुख्य अन्न असलेला रेशनिंग तांदूळ त्यातच होते मिलावट. नागरिकांचे जीवन झाले धोकेदायक

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रेशनिंग दुकानांमध्ये मिळत असलेल्या तांदूळ या मधूनच सध्या वाटप चालू असलेल्या रेशनिंग दुकानांमधून नागरिकांना दिला जातोय . रेशनिंग मध्ये भेटतोय मिक्स तांदूळ, (मिक्स तांदूळ म्हणजे प्लॅस्टिक तांदूळ 5 किलो तांदळा मागे कमीत कमी 50 ग्रॅम प्लास्टिकचे तांदूळ निवडले असल्यास भेटतात. यामुळे नागरिकांचे जीवालाधोका आहे).

हेच तांदूळ खाऊन अनेक लोक गंभीरआजारांना बळी पडतात . याचमुळे रेशनिंग चे तांदूळ खावे की नाही? असा संभ्रम जनतेमध्ये दिसून येत आहे.याकडे अन्नधान्य पुरवठा अधिकारी केव्हा लक्ष देणार की नाही, का हा जाणून- बुजून घडतोय हा प्रकार? नागरिकांचा जीव धोक्यात आहे का? असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा बनला आहे.

गोरगरीब नागरिकांना रेशनिंग दुकानांमधून तांदूळ, गहू घेऊन आपली उपजीविका भागवत असतानाच नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार चालू झालेला दिसत आहे. आता रेशन दुकानांमध्ये रेशन घ्यावे. की नाही गोरगरीब जनतेमध्ये चालू आहे. आजारांचे नेमके कारण काय आहे कशामुळे जनता अनेक आजारांना बळी पडत आहे .

या भीतीने तरी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सर्वसामान्य जनतेमधून होत आहे. यामध्ये अन्नधान्य व नागरी पुरवठा अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून शहानिशा करून चाचणी करणे गरजेचे आहे . त्यानंतरच रेशनचे वाटप नागरिकांपर्यंत करण्यात यावे.असे वक्तव्य नागरिक करत आहेत. गोरगरीब नागरिक प्रतीक्षेत आहेत.

 खरंच … यामध्ये कोण ठरणार दोषी ? 

नेमकी यात कोणाची चूकआहे लवकरच आपण जाणून घेऊ यात. आपण सर्वांनी मिळून आवाज उठवू या आणि हे प्लास्टिकचे तांदूळ हटवूया. मी आवाहन करते की प्रत्येक महिला सतर्क झाली पाहिजे आणि जागरूक झाली पाहिजे जर कोणी आपले अन्नात भेसळ करत असेल तर ती भेसळ खपवून नाही घेतली पाहिजे.

मी माझ्या बातमीमार्फत सर्वांना आवाहन करते की रेशनिंग चे तांदूळ जर का कोणी खात असेल तर त्या लोकांनी तांदूळ व्यवस्थित निवडूनच वापर करावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे