ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

उमेद सोशल फौंडेशन च्या द्वितिय वर्धापन दिन व जागतिक महिला दिनानिमित्त रेशीमगाठी लॉन या ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

उमेद सोशल फौंडेशन जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल् कार्यगौरव पुरस्कार देण्यात आला.

तसेेच या वेळी आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर,स्त्रीयांचे आरोग्य व उपचार, व्यसन्मुक्ति, स्त्री सक्षमीकरण यावर व्याखान घेण्यात आले. तसेच सिनेअभिनेते महाराष्ट्राचे लाडके भावजी राजेश मन्चरे यांनी खेळ पैठणी चा कार्यक्रम घेतला या वेळी महिलांनी हि कार्यक्रमाचा आनंद घेतला . अशा विविध सामाजिक कार्यक्रमानी सर्वांचे लक्ष वेधले..

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे चे संतोष लांडे,मा.उपसभापती मनपा चे डॉ.दिलीप पवार,साई आदर मल्टीस्टेट चे शिवाजी कपाळे, व्हेरासिटी फौंडेशन च्या अध्यक्षा ज्योती सोनिग्रा,महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखेच्या महिला पोलीस दीपा आठवले,उद्योजक किरण दाभाडे,सिंडिकेट बँक अधिकारी महादेव ढोबळे,स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट हे होते या वेळी कार्यक्रमाची ची सुरवात दीपप्रज्वलन करून महापुरुषाना पुष्पहार घातले.

तसेंच आरोही संगीत विद्यालय तर्फ स्वप्नील खराडे, व प्रा.आदेश चव्हाण व त्यांचे संपूर्ण विद्यार्थी टीमने स्वागत गित व तबला, पेटी वादन करून प्रेशकान्चे मन जिंकले .

उमेद सोशल फौंडेशन चे अध्यक्ष अनिल साळवे यांनी उमेद फौंडेशन चे केलेले कार्य या विषयी सांगितले तसेंच उमेद चे उपाध्यक्ष कुणाल तनपुरे यांनी उमेद चे पुढील कार्य विषयी मत मांडले .

शिवाजी कपाळे यांनी उमेद च्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या डॉ .दिलीप पवार यांनी सर्व उमेद च्या टीम चे कौतुक केले ज्योती सोनिग्रा यांनी पुढील काळात उमेद बरोबर काम करून गरीब मुलांना मदत करू.. तसेंच दीपा आठवले यांनी महिलाची सुरक्षा व कायदा या विषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमा दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील नवीन शाखेतील पद नियुक्त करण्यात आले,शाखा प्रमुख कुणाल तनपुरे, कार्यकरी अधिकारी राजेश मंचरे ,प्रमुख सल्लागार रणजित लहारे,जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे,संघटक श्रीकांत राऊत यांना नियुक्ती पत्र देण्यात आले..

या कार्यक्रमाला ग्रामपन्च्यायत सदस्य सागर सप्रे,आप्पासाहेब सप्रे, आर्ट ऑफ लिविंग च्या भारती कोळसे, युगान्धर फौंडेशन च्या विद्या करपे,दिव्याकुर फौंडेशन पुणे चे अध्यक्ष लक्ष्मन म्हस्के,वेल्नेस कोच कविता खर्डे ,जिल्हा महिला अध्यक्ष रीपाई च्या ज्योती पवार,जिल्हा अध्यक्ष आप चे भरत खाकाळ, जिल्हा अध्यक्ष रिपाई चे सुशांत म्हस्के,जिल्हा रुग्णालय नेत्र विभाग चे सतीश आहिरे,शब्दगंध चे सुनील गोसावी,परिवर्तन न्युज चे राम शिंदे,प्रिया डोळस,मनीषा कदम,शीतल खराडे,श्रुती चव्हाण,अर्जुन वायभासे ,राधा साळवी उपस्थित होते..

कार्यक्रमाचे नियोजन उमेद फौंडेशन चे सचिव सचिन साळवी,सल्लागार ऍड.दीपक धिवर,सद्स्य विजय लोंढे,रवी सुरेकर,रवी साखरे,योगेश घोलप,प्रकाश भालेराव, अ‌क्षय गाडेकर,शुभांगी सोनवणे,मनीषा साळवे वैशाली तनपुरे, रेशमा तनपुरे,उमंग फौंडेशन चे अध्यक्ष डॉ.सतीश गिऱ्हे,प्रगती फौंडेशन च्या अध्यक्ष अश्विनी वाघ, यांनी केले.या कार्यक्रमाला मोठया प्रमाणावर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते..

या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे,राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरागे,नेहरू युवा केन्द्राचे सम्न्वय अधिकारी संकल्प शुक्ला,रमेश घाडगे जय असोसिएशन चे अध्यक्ष महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे