मराठी भाषा गौरव दिन निमित्त विशेष कार्यक्रमात कवयित्री, लेखिका हिरकणी सौ.अनिता गुजर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित.
डोंबिवली, मुंबई

डोंबिवलीतील नामांकित डॉन बॉस्को शाळेतर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन निमित्त विशेष कार्यक्रमात कवयित्री,लेखिका हिरकणी सौ.अनिता गुजर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेनी ब्राईट ,शाळेच्या मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख श्री.पद्माकर भावे सर, यांच्या नियोजनाखाली शाळेतील मुलांकडून मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या नृत्य, गायन, नाटुकली, काव्यवाचन, अशा विविध कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन केले होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व महाराष्ट्र गीत सादर करून झाली.
विशेष म्हणजे कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन छोट्या मुलांनीच केले.या सर्व लहान मुलांचे कौशल्य बघून कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या…
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी….
सौ.मेघा पोतनीस मॅडम,सौ.ज्योती माटे मॅडम,धनश्री मॅडम,वैशाली मॅडम तसेच इतर सर्व शिक्षिकांच्या सहकार्याने कार्यक्रम दणक्यात पार पडला.