
पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शहरातील बालेवाडी परिसरात छापेमारी करत एका हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 7 राज्यांतील 10 मुलींची सुटका करण्यात आली आहे.
तर 5 दलालांवर पिटा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच कोरेगाव पार्क परिसरात एका तारांकीत हॉटेलमध्ये पोलिसांनी सापळा रचून राजस्थानी अभिनेत्री आणि 2 उझबेकिस्तानच्या तरुणींना ताब्यात घेतले होते.